Ticker

6/recent/ticker-posts

नागपूरच्या जरीपटका परिसरातून ३० वर्षीय महिला बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल



दैनिक लोकयुवा | नागपूर  प्रतिनिधी : प्रतीक वाढई

नागपूर : शहरातील जरीपटका परिसरातून ३० वर्षीय प्रतीक्षा प्रवीण चव्हाण या महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा चव्हाण या ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, बराच वेळ होऊनही त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच परिसरात त्यांचा शोध घेतला; परंतु त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.

अखेर त्यांचे पती प्रवीण चव्हाण यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

बेपत्ता महिलेचे वर्णन

नाव: प्रतीक्षा प्रवीण चव्हाण

वय: ३० वर्षे

रंग: सावळा

चेहरा: लांबट

उंची: ५ फूट ३ इंच

पोशाख: लाल व खाकी रंगाच्या रेषा असलेला सलवार सूट

विशेष खूण: डाव्या हातावर भाजल्याची खूण

नागरिकांना आवाहन

वरील वर्णनातील महिला कोणाला आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ जरीपटका पोलीस ठाणे अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.




Post a Comment

0 Comments