जितेश भाऊ अंतापुरकर देगलुर बिलोली मतदारसंघ
दैनिक लोकयुवा बिलोली तालुका प्रतिनिधी:विनोद वाघमारे
नांदेडयेथेआलेल्या आरोग्य मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध समित्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्यासोबत आयोजित ‘आरोग्य संवाद’ कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत देगलूर व बिलोलीमतदारसंघातील आरोग्यविषयक विविध महत्त्वपूर्ण प्रश्न आमदार माननीय जितेश भाऊ अंतापुरकर यांनी मांडले.
यावेळी नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी पुढील मागण्या व विषय मंत्री महोदयांसमोर मांडले —
देगलूर व बिलोली मतदार सघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी मांडल्या
🔹१०० खाटांच्या रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मतदारसंघाच्या वतीने आभार मानले. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे निधी वितरणाची प्रक्रिया रखडली असून, ती तातडीने पूर्ण करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली.
🔹देगलुर येथे महिलांची संख्या जास्त असल्यामुळे आणि महिलांकडून करण्यात आलेल्या विशेष मागणीमुळे ५० खाटांचे विशेष महिला रुग्णालय मंजूर करून उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
🔹 बिलोली येथे सिटीस्कॅन मशीनची आवश्यकता असून, नांदेड शहर सुमारे १०० किमी तर हैदराबाद २५० ते ३०० किमी अंतरावर असल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर सिटीस्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
🔹 कुंडलवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय दोन वर्षांपूर्वी मंजूर होऊनही आवश्यक मनुष्यबळ व वैद्यकीय साहित्याअभावी लोकार्पण रखडले आहे. आवश्यक कर्मचारी व उपचार साहित्य तातडीने उपलब्ध करून देत रुग्णालय कार्यान्वित करावे, अशी विनंती केली.
🔹 तसेच मतदारसंघातील नागरिकांकडून रात्रीच्या वेळी डॉक्टर, कर्मचारी व आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये २४ तास आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध राहील, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला वेळेवर, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे हा माझा संकल्प आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी, मनुष्यबळ आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.
.jpg)
0 Comments