Ticker

6/recent/ticker-posts

बालदिनानिमित्त जव्हार पोलीस ठाण्यात जनजागृती मेळावा; बालहक्क, पॉक्सो कायदा आणि सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन

 


दैनिक लोक युवा पालघर जिल्हा प्रतिनिधी फैजान खान

बालदिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटना व महाराष्ट्र पोलीस (पालघर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्रमजीवी विद्यार्थी संघटना आणि जव्हार पोलीस ठाण्याच्या सहकार्याने जव्हार पोलीस ठाण्यात बालदिन विशेष कार्यक्रम व जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 'आजचे मूल, उद्याचे भविष्य सुरक्षित बालपण, सक्षम समाज' या संदेशातून बालकांच्या सुरक्षिततेचा आणि कायदेविषयक जनजागृतीचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरण पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी आणि उपस्थितांना विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बालकांचे संरक्षण करणारा पॉक्सो (POCSO) कायदा, सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती तसेच ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षितता या विषयांचा समावेश होता. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव आणि बालकांच्या हक्कांचे संरक्षण याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रमजीवी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष विवेक पागी यांनी भूषविले. यावेळी पालघर जिल्हा संघटक किशोर भाऊड मडवी, श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित गायकवाड, तालुका सचिव संतोष धिंडा, तालुका उपाध्यक्ष परशुराम गांगोडा, रामदास दांगडे, सुनील हिरकुडा, भास्कर जाबर तसेच तालुका संघटक गोविंद गवित आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याशिवाय मोहन वझरे, निलेश भसरा, कमलाकर वाघ, युवराज वाघ, नितीन पढेर, रवी पढेर, चंदर भोये, विजय नडगे, विजय दिघे, अशोक आसम, गणेश धिंडा, सरिता ताई मोरे, यमुना ताई रोज यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि श्रमजीवी विद्यार्थी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बालकांचे सुरक्षित बालपण, त्यांचे कायदेशीर हक्क आणि समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते, जव्हार पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि श्रमजीवी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments