संभाजिनगर येथे दि.31/10/2026 रोजी पार पडलेल्या जिल्ह्यास्तरिय जलतरण स्पर्धेत १०० व ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये प्रथम क्रमांक; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
दैनिक लोकयुवा जालना / संतराम जाधव
छत्रपती संभाजीनगर : येथील सिद्धार्थ गार्डनमध्ये आयोजित जलतरण स्पर्धेत ओमराजे संतराम जाधव यांनी घवघवीत यश संपादन केले. १७ वर्षांखालील गटातील १०० मीटर फ्रीस्टाइल आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल या दोन्ही प्रकारांत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेतील १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात ओमराजे संतराम जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर उमेद रहीम सय्यद यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारातही ओमराजे जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या प्रकारात साई संतोष कारकेंनी द्वितीय क्रमांक मिळविला.
याशिवाय ५० मीटर फ्रीस्टाइल (मुक्त जलतरण) १७ वर्षांखालील गटात लिंगसे आर्यन राजेंद्र यांनी प्रथम क्रमांक मिळविला. २०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात साई संतोष कारकेंनी प्रथम क्रमांक पटकावला.
ओमराजे संतराम जाधव यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. जलतरण क्षेत्रात त्यांनी मिळविलेले हे यश इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

0 Comments