Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रिय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा चे निवेदन ओबीसींची एस सी, एस टी प्रमाणे जातीनिहाय जनगणना करा



 दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे

 ओबीसींच्या जातनिहाय जनगणना करण्यासाठी राष्ट्रीय पिछडावर्ग ओबीसी मोर्चा च्या राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलनाचा सहावा टप्पा जिल्हास्तरावर रॅली प्रदर्शन ओबीसी जिल्हा युनिट च्या वतीने दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोन वाजता ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी ड्रॉप डाऊन सूची देऊन एससी एसटी प्रमाणे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी रॅली करण्यात आली. ही रॅली यवतमाळ येथील महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुले चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये ओबीसी सह एससी, एसटी, विजे. एनटी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         २०११ मध्ये सामान्य जनगणनेत ओबीसींची जनगणना न करता ओबीसी सोबत फसवणूक केली होती. त्या ऐवजी एक सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये जातींचे तपशील भरण्यासाठी खोल्या नोंदीची पद्धत वापरण्यात आली. अलग अलग नावे उप नावे स्थानिक नावे वर्तन येतील फरक आणि समान जातींची वेगवेगळी नावे नोंद व त्यामुळे आकडे संकलित करणे आणि वर्गीकरण करणे अत्यंत गुंतागुंतीचे झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रुटी निर्माण झाल्या आणि लाखो जातींच्या नोंदी झाल्याचे दिसून आले. सरकारने नंतर या आकडेवारीबाबत विविध कारणे सांगितली परंतु जातीनिहाय संपूर्ण आकडेवारी आजपर्यंत सार्वजनिक केलेली नाही. जर जनगणना २०१७ मध्ये ही याच प्रकारची अनिश्चित ओपन कॉलम पद्धत वापरण्यात आली तर २०११ प्रमाणे जातींचे आकडेवारीत विसंगती गोंधळ आणि गंभीर त्रुटी निर्माण होतील त्यामुळे देशातील विश्वसनीय जातीनिहाय जनगणनेचा उद्देश साध्य होणार नाही. तसेच वास्तव प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेला आधार कमकुवत होईल आणि सरकार २०११ च्या आकडेवारी प्रमाणेच पुढील आकडेवारी ही दडपून ठेवू शकते. त्यामुळे ओबीसी आणि इतर वंचित समूहांना कोणताही वास्तविक फायदा होणार नाही.

     म्हणूनच आम्ही मागणी करतो की एससी एसटीच्या जनगणनेसाठी जशी व्यवस्थित मानकिकृत आणि स्पष्ट क्रिया वापरली जाते त्याचप्रमाणे ओबीसींच्या स्वतंत्र जातीनिहाय जनगणनेसाठी ही स्पष्ट आणि वैज्ञानिक व्यवस्था लागू करण्यात यावी.

          रॅलीच्या शेवटी मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपती महोदय यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना यवतमाळ जिल्ह्यातील १६ ही तालुक्यातील ओबीसी सह एस. सी. एस.टी, विजे.एन. टी. समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments