Ticker

6/recent/ticker-posts

मेंढपाळ व शेतकरी महिलांना मारहाण करून दागिने लुटणाऱ्या पर जिल्ह्यातील टोळीचा म्हसवड पोलिसांकडून उघड



दैनिक लोक युवा/जिल्हा प्रतिनिधी नितीन राठोड 

दि.,3/10/2026 म्हसवड व अकलूज पोलीस ठाण्याचे हद्दीतील जबरी चोरीचे एकूण 6 उघड.मसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव व भटकी गावचे हद्दीतील रानात मेंढ्या चारणाऱ्या सर्वच शेतात काम करणाऱ्या महिलांना एकटे पाहून त्यांच्यावर हल्ला करून मारहाण करून त्यांचे गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्या संबंधाने प्राप्त तक्रारी वरून म्हसवड पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचे एकूण 4 दाखल करण्यात आले होते. आरोपींनी एकूण 26 ग्रॅम वजनाचे.4.50.000/रुपये रकमेचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. सदर पुण्यातील आरोपींचा शोध घेणे पोलिसांना आवाहन होते. 

सदर गुन्हा तील. आरोपींचा शोध घेणे का मी पोलीस गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेत होते. परंतु आरोपी हे मिळून येत नव्हती. पोलिसांना गोपनीय बातमीदार यांच्याकडून आरोपींचा मोबाईल मध्ये चित्रीकरण केलेले दोन सेकंदाचा व्हिडिओ प्राप्त झाला होता सदर व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू झाला. 

परंतु आरोपींचे व्हिडिओ मध्ये चित्रीत झालेल्या मोटरसायकलचा नंबर हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. मा. पोलीस अधीक्षक.मा. अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा व या. उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, दहिवडी यांनी जबरी चोरीचे वरील सर्व गुन्हे. लवकरात लवकर उघड करण्याबाबत दिले सूचनानुसार सह. पोलीस निरीक्षक. संदीप. पोमण.यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मसवड पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक स्थापन केले. सदरचे पथकाने जबरी चोरी करणारे अनोळखी आरोपींचा शोध घेऊन, 1 इरफान उर्फ सोन्या नजीर मुलानी, वय 23 वर्ष, 2 विजय उर्फ भैया सतीश जाधव. वय ॒॒ 22 वर्ष. दोन्ही राहणार. खोरोची.  ता. इंदापूर.जि. पुणे यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपींनी महिलांना मारहाण करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केली असल्याचे कबूल केले सदर आरोपींनी अकलूज पोलीस ठाणे कडील जबरी चोरीच्या/02 गुन्ह्याची  कबुली दिली. सर्व पुण्यातील जबरदस्तीने चोरी केलेले एकूण 36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत, 6.00.000/-रुपये काढून दिले तसेच गुन्ह्यात वापरलेल्या.02 मोटरसायकली व 02 मोबाईल असा एकूण 8.50.000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर सदरचा गुन्हा तपास अमित शिंदे, पोलीस उपनिरीक्षक म्हसवड पोलीस ठाणे, हे करत आहे. 

मसवड पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण झाले असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्वपूर्ण ठरली आहे. सदरची कामगिरी मा. श्री निखिल पिंगळे. पोलीस अधीक्षक सातारा. श्री मती. वैशाली कडुकर. अप्पर पोलीस अधीक्षक सातारा. श्री रणजीत सावंत. उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग. दहिवडी यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड स्टेशनचे प्रभारी. अधिकारी सह पोलीस निरीक्षक संदीप पोहण. उपनिरीक्षक अमित शिंदे व. अमलदार अमर नानवरकर. जयराज कवडे. अनिल वाघमारे. नवनाथ शिरकुळो. संतोष काळे. सतीश जाधव. महिला अंमलदार. मैना. हंगे, यांनी केले असून कारवाई मध्ये सहभागी अधिकारी व अमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments