Ticker

6/recent/ticker-posts

चाळीसगाव फाटा परिसरात भीषण अपघात; पुतण्याचा जागीच मृत्यू, तर काका गंभीर जखमी



  दैनिक लोकयुवा   प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे 

 चाळीसगाव फाटा परिसरातील महादेव मंदिराजवळ मोटारसायकल आणि आयशर वाहन यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील मृत आणि जखमी व्यक्ती मालेगाव तालुक्यातील देवघट येथील असून मृत पावलेला व्यक्ती हा द्याने येते राहत होता तर जखमी व्यक्ति लेंडाणे येथील रहिवासी आहेत . या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच ४१ बीजी ५८४६ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून दोघे काका पुतणे हे देवघट येथून भावकीतील रक्षाविसर्जनचा कार्यक्रम करून मालेगावच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मालेगावकडून चाळीसगावच्या दिशेने आयशर वाहन जात होते. महादेव मंदिराजवळ या दोन्ही वाहनांचा अपघात झाला. आयशर वाहनाने मोटारसायकलला जोरदार कट मारल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

या धडकेत मोटारसायकलवरील देवघट येथील मात्र सध्या द्याने येथे वास्तव्यास असलेले श्री दीपक सुरेश भदाणे यांचाजागीच मृत्यू झाला, तर त्यांचे काका श्री दिनकर रामभाऊ भदाणे राहणार लेंडाने हे गंभीर जखमी झाले आहेत . अपघाताची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. जखमी व्यक्तीला उपचारासाठी मालेगावात रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे;

.महादेव मंदिराजवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा आणि रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिकृत माहिती मिळणे आवश्यक आहे. जखमीची प्रकृती सध्या बरी असल्याचे सांगण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments