Ticker

6/recent/ticker-posts

नेवरीत शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक !


महावितरणच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांना फटका; लाखोंचे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी

दैनिक लोकयुवा प्रतिनिधी .सागर काळे

नेवरी : कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे २५ ऑक्टोबर रोजी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी सुखदेव गोरड आणि सोमेश्वर नवाळे यांचा सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला असून, दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव गोरड आणि सोमेश्वर नवाळे यांच्या शेतातून महावितरणच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. या तारा अनेक दिवसांपासून खाली लोंबकळत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित महावितरण कार्यालयाकडे वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

२५ ऑक्टोबर रोजी वाऱ्यामुळे लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारोमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या. या ठिणग्यांमुळे शेतातील उस्ना ठेत्वात्ता आग ठिणग्यामुळ लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझविण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रयत केले; मात्र वाऱ्याचा वेग अधिक असल्यांने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. परिणामी, सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.

लाखोंचे नुकसान; शेतकरी हतबल.

वर्षभर कष्ट करून उभे केलेले उसाचे पीक डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आंधीच शेतीतील वाढता खर्च आणि अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना या घटनेने त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

नुकसानभरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा.

या घटनेनंतर नेवरी परिसरातील ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित महसूल विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करावा, तसेच पीडित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष दिले असते, तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नुकसानभरपाई मिळाली नाही, तर महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नेवरीतील ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments