१९ ऑक्टोबरला ह.भ.प.सोनालीताई फडके यांच्या वाणीतून रंगणार भव्य हरीकिर्तन!
दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे
आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या दिग्रस तालुक्यातील मांडवा गावात यंदा 'नव जागृत दुर्गामाता मंडळ' आयोजित ५१ व्या नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्सवानिमित्त गावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून, स्वर्गीय नागेश फरीदा रत्ने व स्वर्गीय गीताबाई नागेश रत्ने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेला भव्य हरीकिर्तन सोहळा पंचक्रोशीतील भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
येत्या १९ ऑक्टोबर (सोमवार) रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत मांडवा येथील श्री विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडेल. या सोहळ्यात वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. वाणीभूषण सौ. सोनालीताई फडके (कानागावकर, ता. दौंड, पुणे) यांची कीर्तनसेवा लाभणार आहे. आपल्या ओघवत्या शैलीत संतविचारांची मांडणी आणि समाजप्रबोधन करणाऱ्या सोनालीताईंच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक आतुर झाले आहेत.
पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता आरती, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता महाआरती आणि रात्री ९ वाजता हरीकिर्तन. १९ ऑक्टोबर, रात्री ९ ते ११ (ह.भ.प. सौ. सोनालीताई फडके), २० ऑक्टोबर २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता 'श्रीं'ची विसर्जन मिरवणूक निघणार.
या ५१ व्या महोत्सवामुळे मांडवा व लगतचा परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला असून, १९ ऑक्टोबरचे हरीकिर्तन आणि २० ऑक्टोबरच्या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन 'नव जागृत दुर्गामाता मंडळ' व 'रत्ने परिवार' यांच्या वतीने करण्यात आले आहे

0 Comments