Ticker

6/recent/ticker-posts

विभागीय क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल शरयू महामुनीचा सत्कार



दैनिक लोक युवा भूम (कुणाल लगाडे) : 

श्री गुरुदेव दत्त हायस्कूल, भूम येथील विद्यार्थिनी कु. शरयू महामुनी हिची विभागीय क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक किरण जाधव यांच्या हस्ते शरयूचा सत्कार करण्यात आला.यावेळी गुरुदेव प्राथमिक विद्यामंदिर, भूमचे मुख्याध्यापक भोरे सर, पर्यवेक्षक बांगर सर, वर्गशिक्षक राऊत सर, क्रीडा शिक्षक शिंदे सर यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.शरयूने मिळवलेल्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments