Ticker

6/recent/ticker-posts

निमसोड सिद्धनाथ विद्यालय निमसोड येथील महिला पुरुष साक्षरता अभियान परीक्षा पार पडली



दैनिक लोक युवा प्रतिनिधी (नितीन राठोड) 

दि, 25 ऑक्टोंबर 2026 रोजी सिद्धनाथ विद्यालय येथे महिला पुरुष साक्षरता अभियान परीक्षा संपूर्ण करण्यात आले आहे.  गेल्या अनेक दिवसापासून महिला पुरुष आपापल्या परीने वाचन व लेखन व आपली सही करण्याचे प्रयत्न चालू होते आज अखेर त्यांनी विद्यालयात उपस्थित राहत न डगमगता आपण काय शिकलो काय शिकवले आज तयारी करून पेपर सोडवायचे असा निर्धार महिला पुरुष यांनी केला आहे. 

शाळेची मुख्याध्यापक श्री घाडगे सर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे राहिले आहेत व सौ. मदने मॅडम व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले राहिलेले सर्व महिला पुरुष यांनी शिक्षक यांना संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा व परीक्षा देण्याचे आपण इच्छुक आहे असे सांगावे . सर्व गावातील परिसरातून शुभेच्छाचा देत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments