Ticker

6/recent/ticker-posts

नमो'चे दोन हप्ते रखडले



दैनिक लोकयुवा पालघर प्रतिनिधी फैजान खान 

जव्हार: आदिवासी भाग असलेल्या जव्हार तालुक्यात केवळ पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. या हंगामात येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. हा हंगाम संपला की येथील नागरिक पोटाची खळगे भरण्यासाठी शहराकडे स्थलांतरित होत असते. अशी विदारक परिस्थिती असताना, यंदा तर पावसाने ऐन खरीप हंगामात उघडीप घेतल्याने येथील शेतकरी दुष्काळात सापडून आर्थिक मेटाकुटीला आला आहे. अशातच नमोचे शेतकऱ्यांना मिळणारे दोन हप्ते रखडल्याने येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

    खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, पावसाची अनिश्चितता, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता 'नमो शेतकरी महासन्मान निधी'च्या हप्त्यांची प्रतीक्षा लागली आहे. या योजनेचे दोन हप्ते प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींत भर पडली आहे.

   दीवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी, अशी मागणी होत आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादनाची आशा मावळली आहे. पिकांच्या खर्चासाठी घेतलेले पैसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह, आगामी रब्बी हंगामाची तयारी अशा अनेक जबाबदाऱ्या शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यातच सणासुदीच्या काळात घरखर्च भागविताना त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने जून २०२३ मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, दोन हप्ते रखडल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक आधार मिळालेला नाही.

    दुष्काळसदृश परिस्थिती, खरीप पिकांच्या नुकसानीमुळे ही मदत वेळेत मिळणे आवश्यक आहे. दीवाळीपूर्वी अग्रिम मदतीची रक्कम, प्रलंबित हप्ते खात्यावर जमा झाल्यास शेतकऱ्यांना सण साजरा करण्यासह शेतीच्या पुढील नियोजनासाठी काही प्रमाणात आधार मिळू शकतो. त्यामुळे शासनाने निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अपेक्षा व्यक्त होत आहे. अशी मदतीची आशा शेतकरी करू लागले आहेत.

**घोषणा नको, खात्यावर मदत हवी !**

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.अशा वेळी आर्थिक मदतीचे हप्ते रखडल्याने अडचणीत भर पडली आहे. शासनाने केवळ घोषणा न करता प्रलंबित निधी प्रत्यक्ष खात्यावर जमा करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

**दिवाळीपूर्वी निधीची मागणी**

दिवाळी जवळ आली असताना खरीप पिकांचे नुकसान, वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधीचे प्रलंबित दोन हप्ते, घोषित पाच हजार रुपयांची अग्रिम मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी होत आहे. सणासुदीच्या काळात कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना या मदतीचा आधार मिळू शकतो.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारे दोन हजार रुपये शेती हंगामात अतिशय उपयुक्त ठरत असतात मात्र यंदा हे दोन हजार रुपये न मिळाल्याने शेतकऱ्यांना खर्च भागवताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. - पांडुरंग दरोडा, शेतकरी झाप

Post a Comment

0 Comments

ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88