‘जनसेवा ते राष्ट्रसेवा’ संकल्पनेतून आर्वीतील गांधी विद्यालयात भाजपातर्फे आयोजन.
पवन शिरभाते प्रतिनिधी आर्वी : जिल्हा वर्धा.
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘जनसेवा ते राष्ट्रसेवा’ या संकल्पनेतून आर्वी जिल्हा वर्धा येथील गांधी विद्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ५ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ३० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकांना विविध सामाजिक व विकासात्मक विषय देण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान जनकल्याण योजना, विकसित भारताची वाटचाल तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजना व उपक्रम यांचा प्रामुख्याने समावेश होता. स्पर्धकांनी आकर्षक व नमुनेदार रांगोळ्या साकारून उपस्थितांची दाद मिळवली.
बक्षीस वितरण सोहळास्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा वर्धा जिल्हा भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई येरावार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरपरिषद अध्यक्षा सौ. स्वातीताई गुल्हाने, उपाध्यक्ष गौरव जाजू, सभापती अजय कटकवार, शहर भाजपा अध्यक्ष राहुल गोडबोले, उपाध्यक्ष ज्ञानदेव साठे, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सारिका लोखंडे, भाजपाचे रोशन पवार, अर्सलाम खान, आर्वी शहर अध्यक्षा शुभांगी गाठे, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या संयोजिका उषा सोनटक्के, लवेश गलोले, कांता कसर, उर्मिला पवार यांच्यासह नगरपरिषद सदस्य व महिला आघाडीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
विशेष उपस्थितीमध्ये नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती प्रकाश गुल्हाने तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिलजी जोशी उपस्थित होते.तन्वी गलोले प्रथमस्पर्धेत तन्वी गलोले यांनी प्रथम क्रमांक पटकावत ३ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळविले. काजल ठाकरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत २ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले, तर प्रिया नेमाडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. समीक्षा गोडसे व वृंदा दामले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.या स्पर्धेसाठी वैशालीताई भांडे व योगेश ताजनेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती शिरपूरकर यांनी केले, तर आभार भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या रंजना कदम यांनी मानले.
या कलात्मक स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन नगरपरिषद अध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाने व सहसंयोजिका तथा नगरपरिषद सदस्य संपदा जोशी यांनी केले. भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रांगोळी स्पर्धा पाहण्यासाठी आर्वीकरांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले.

0 Comments