प्रतिनिधी पवन शिरभाते आर्वी जिल्हा वर्धा.
'व्हॉईस ऑफ मीडिया' आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम (विदर्भ विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वर्धा येथे एकदिवसीय विदर्भस्तरीय कॅडर कॅम्प मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शिबिरात विदर्भातील शेकडो पत्रकारांनी उपस्थिती लावली होती. या प्रसंगी आर्वीचे ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री. दशरथजी जाधव यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुकूलता निर्माण करणारे विचार व्यक्त केले.
पत्रकारितेसमोरील सद्यस्थितीतील आव्हाने, पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांवर श्री. दशरथजी जाधव यांनी प्रकाश टाकला. त्यांनी सर्व पत्रकार बांधवांच्या भावना आणि मागण्या अत्यंत प्रभावीपणे 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या केंद्रीय व राज्य नेतृत्वापर्यंत (अध्यक्षांपर्यंत) पोहोचविल्या. त्यांच्या या सकारात्मक आणि मार्गदर्शक भूमिकेमुळे उपस्थित पत्रकारांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळाला.
पत्रकारांच्या हक्कांची बाजू भक्कमपणे मांडल्याबद्दल आणि संघटनेच्या व्यासपीठावर सर्वांचे विचार योग्य रीतीने पोहोचविल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने श्री. दशरथजी जाधव यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
या कॅडर कॅम्पला आमदार समीर कुणावर, 'जय महाराष्ट्र' न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद काथे, 'व्हॉईस ऑफ मीडिया'चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के पाटील आणि प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्यासह विदर्भातील अनेक नामवंत पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते. श्री. जाधव यांनी व्यक्त केलेल्या विचारांमुळे या कॅम्पमधील चर्चांना एक योग्य दिशा मिळाली, अशी भावना उपस्थित पत्रकार बंधूंनी व्यक्त केली आहे.

0 Comments