दैनिक लोकयुवा भूम (कुणाल लगाडे) : महाराष्ट्रात भीषण असा कोरडा दुष्काळ पडला असून पाण्याचे स्त्रोत कमी होऊन विहिरीमधील तलावामधील पाणी कमी झाले असून त्यामुळे आगामी काळामध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये या उद्देशाने भरारी पथकाच्या माध्यमातून यापूर्वी समज देऊनही उपसा होत असल्याने आरसोली लपा प्रकल्प, तालुका भूम या ठिकाणी १९ ऑक्टोंबर रोजी भरारी पथकाद्वारे संयुक्त कारवाई करून 3 मोटारी व पाईपलाईन जप्त करण्यात आली.वांगी -जवळा तलाव येथील पाणी उपसा रोखणेसाठी विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला. वांगी खुर्द व जवळा या दोन गावांचे पाणी पुरवठा योजना या तलावावर कार्यरत आहेत. ही कार्यवाही महसूल, पाटबंधारे, महावितरण व पोलीस विभाग यांचे मार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. पिण्याचे पाणी संरक्षण व्हावे व अवैध उपसा होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली.
या पूर्वी समज देऊनही उपसा केला जात असल्याने ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती भूम तहसीलदार जयवंत पाटील यांनी दिली

0 Comments