अभियान अंतर्गत धडक मोर्चा; निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी मागितली
भूम (कुणाल लगाडे) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ या अभियानांतर्गत आज भूम येथे तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मतदार यादीतील कथित अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळातील फेरबदलांची सखोल चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.लोकशाहीच्या रक्षणासाठी निदर्शने लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार यादी हा अत्यंत महत्त्वाचा व मूलभूत आधार आहे. मात्र, अलीकडच्या काळात मतदार यादीत फेरबदल होणे, पात्र नागरिकांची नावे वगळली जाणे आणि अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट होणे यांसारख्या गंभीर बाबी समोर येत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास अबाधित राहावा आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा घटनात्मक अधिकार सुरक्षित राहावा, यासाठी हा लढा उभारण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर मोर्चाच्या समाप्तीनंतर तहसीलदारांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील मतदार यादीतील फेरबदल व कथित अनियमिततेची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी.चौकशी निष्पक्षपणे पार पडेपर्यंत संबंधित पदाधिकाऱ्यांवर/सक्षम प्राधिकरणाने योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी,मतदार यादीतून नावे वगळणे, नवीन नावे समाविष्ट करणे व इतर सर्व बदलांची पारदर्शकपणे पडताळणी करण्यात यावी,प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत कायम राहून त्याचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवावा,मतदार यादीशी संबंधित प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करून तातडीने कार्यवाही करावी,आगामी निवडणुका आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात वरिष्ठ पातळीवर पाठवण्याची मागणी निवेदनाचे स्वीकार केल्यानंतर तहसीलदारांनी हे निवेदन संबंधित वरिष्ठ प्राधिकरणाकडे तातडीने पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आली.‘मत वाचवा, देश वाचवा’ या घोषाोश्रेसह भूम शहरात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांच्या मताचा अधिकार सुरक्षित राहणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू भूम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.सिराज मोगल, गटनेते रुपेश शेंडगे धाराशिव एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष ॲड. मुशरफ सय्यद, जिल्हा सरचिटणीस समीयोदिन काझी युवक काँग्रेसचे मोईज सय्यद दत्ता तांबे मोहम्मद पटेल भीमराव देशमुख घनश्याम लावंड बादशाह शेख जयंत अंधारे लक्ष्मण शिंदे बाळासाहेब देशमुख सरीपुत भोसले महादेव जाधव बाबू तोरकड गोरख माळी चक्रधर पिसाळ पपू तेलंगे यशवंत डमरे यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments