भूम (कुणाल लगाडे) :
छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर अंगरक्षक व स्वराज्याचे निष्ठावंत मावळे शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती सध्याच्या दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मिरवणुकीला फाटा देत विविध सामाजिक उपक्रमाने भूम मध्ये साजरी करण्यात आली. गोलाई चौक भूम या ठिकाणी शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले, पोलीस अधिकारी अमोल मोहिते यांच्या हस्ते हार श्रीफळ फोडून करण्यात आले.तसेच ग्रामीण रुग्णालय भूम येथे रुग्णांना फळे वाटप व सोजर मुकबधिर शाळा येथे विद्यार्थ्यांना अल्पउपहाराचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन शिवरत्न जिवाजी महाले युवा मंच, सार्वजनिक जयंती महोत्सव कमेटी भूम शहर, समस्त नाभिक समाज यांच्यावतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी भूम शहरातील सामाजिक व राजकीय व्यक्तींची देखील उपस्थिती होती. तसेच मोठ्यासंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

0 Comments