Ticker

6/recent/ticker-posts

सप्तश्रृंगी मित्र मंडळ, बोरगांव फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद



 प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे 

बोरगाव येथील सप्तश्रृंगी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली फॅन्सी ड्रेस स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान बालस्पर्धकांपासून मोठ्या गटातील स्पर्धकांपर्यंत सर्वांनीच आपल्या कल्पकतेने, आकर्षक वेशभूषेने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या स्पर्धेमुळे बालकांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि मंचावर सादरीकरण करण्याची क्षमता विकसित होण्यास मदत झाली. विविध वेशभूषांमधून स्पर्धकांनी आपापले कौशल्य दाखवून दिले. चिमुकल्या स्पर्धकांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धकांनी सादर केलेल्या विविध रूपांचे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. आपल्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. नागरिकांची उपस्थिती आणि स्पर्धकांचा उत्साह यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.

सप्तश्रृंगी मित्र मंडळ, बोरगाव यांच्या वतीने आयोजित या उपक्रमातून स्थानिक मुलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे मुलांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळते, तसेच समाजात एकोपा, आनंद आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण होण्यास मदत होते..

Post a Comment

0 Comments