Ticker

6/recent/ticker-posts

बाणेगाव शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी धनंजय (आप्पा) उढाण; उपाध्यक्षपदी सुदाम चव्हाण यांची निवड



जालना / संतराम जाधव 

जिल्हा परिषद शाळा बाणेगाव येथील शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी धनंजय (आप्पा) उढाण यांची, तर उपाध्यक्षपदी सुदाम चव्हाण यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शालेय शिक्षण समितीची भूमिका महत्त्वाची असते. नवनिर्वाचित अध्यक्ष धनंजय (आप्पा) उढाण आणि उपाध्यक्ष सुदाम चव्हाण यांच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.नवनिर्वाचित अध्यक्ष धनंजय (आप्पा) उढाण व उपाध्यक्ष सुदाम चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐

Post a Comment

0 Comments