Ticker

6/recent/ticker-posts

आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न



वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आंदोलन. 


दैनिक लोक युवा जिल्हा प्रतिनिधी, नितीन राठोड 

आजोबांचा मृत्यू नाही खून आहे म्हणत नातवाने कुटुंबासह वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालय येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला.यावेळी वडूज पोलिसांनी त्यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील ज्वलनशील पदार्थ असलेली कॅन पोलिसांनी हिसकावून घेत त्यांना आत्मदहन करण्यापासून परावृत केले आहे. 

वाघमोडवाडी ता. माण येथील.‌‌ बयाजी वाघमोडे या वृद्धाची वारस हक्काच्या वादातून हत्या करण्यात आल्याचा आरोप व या हत्ती कारणीभूत असलेल्या इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुमन विठ्ठल शिंगाडे (रा. शिंगडवाडी) व चांगूना.किसन सरक. (रा. नांदल. ता. फलटण), उत्तम शिंगाडे राहणार. शिंगडवाडी यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे केली होती मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी आज वडूज येथील उपविभागीय कार्यालय येथे आत्मदानाचा प्रयत्न केला


Post a Comment

0 Comments