Ticker

6/recent/ticker-posts

तेरमध्ये श्री संत बाळूमामांच्या महाआरतीसाठी हजारो भाविकांची मांदियाळी!



अमावस्येनिमित्त श्री खंडोबा मंदिरात महाआरती व महाप्रसादाचे आयोजन; बाळूमामा भक्तगणांचा स्तुत्य उपक्रम

तेर प्रतिनिधी | 

तेर, ता. धाराशिव : धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर येथे दर अमावस्येला जगाचे मालक श्री संत बाळूमामा यांच्या महाआरतीनिमित्त हजारो भाविक भक्तांची मोठी गर्दी होत आहे. तेर पेठ येथील श्री खंडोबा मंदिरात दर अमावस्येला महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

श्री संत बाळूमामा यांच्या भक्तीभावाने भारावलेल्या वातावरणात महाआरती पार पडते. महाआरतीसाठी परिसरातील तसेच दूरवरून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. महाआरतीनंतर हजारो भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. या उपक्रमामुळे तेर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत असून, भाविकांमध्ये धार्मिक एकोपा व सेवाभावाची भावना वृद्धिंगत होत आहे.

दर महिन्याला अमावस्येनिमित्त आयोजित करण्यात येणारा हा धार्मिक सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी बाळूमामा भक्तगण विशेष परिश्रम घेत आहेत. यामध्ये प्रविण बंडे, खंडू शिरगिरे, हरी जाधव, नाना गायके, शुभम गायके, सत्यम गायके, प्रकाश सुतार, संतोष इमडे, गणपती कांबळे यांच्यासह सर्व बाळूमामा भक्तगण मोलाचे योगदान देत आहेत.

Post a Comment

0 Comments