Ticker

6/recent/ticker-posts

नागपूरमध्ये ₹९०० कोटींच्या सिमेंट रस्ते प्रकल्पाला ब्रेक


नागपूर, प्रतिनिधी : प्रतीक वाढई

नागपूर शहरातील सुमारे ₹९०० कोटींच्या सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्पाचे काम पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तूर्तास थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे. पाचव्या टप्प्यात सुरुवातीला १३५ रस्त्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर ही संख्या वाढवून २६५ रस्त्यांपर्यंत नेण्यात आली होती. या टप्प्यात सुमारे ९००.२२ किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करण्याचे नियोजन होते. 

सिमेंट रस्त्यांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्तात नमूद आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांची वाट पाहणाऱ्या नागरिकांमध्ये या निर्णयाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोठा प्रश्न: पाणीटंचाई दूर झाल्यानंतर रस्त्यांची कामे कधी सुरू होणार? रखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना आणखी किती काळ त्रास सहन करावा लागणार?



Post a Comment

0 Comments