Ticker

6/recent/ticker-posts

मोगरा शिवारात आठ शेतकऱ्यांचा दहा एकरांतील लाखोंचा ऊस जळून खाक वीजतारांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह, भरपाईची मागणी



प्रतिनिधी  .सागर काळे 

माजलगाव : तालुक्यातील मोगरा शिवारात धोकादायक वीजतारांमुळे आग लागून आठ शेतकऱ्यांची सुमारे दहा एकरांची ऊस पिके मंगळवारी जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, वीजतारांच्या देखभालीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.

शिवारातील बऱ्याच ठिकाणी वीजतारा लोंबकळत असून, काही खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या धोकादायक स्थितीमुळे पिकांना आग लागण्याबरोबरच जीवितहानीचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वीज वितरण यंत्रणेकडून नियमित तपासणी २७ऑक्टोबर रोजी दुपारी १:०० वाजता मोगरा शिवारात आग लागली, करण्यात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या आगीत बाळू बाबुराव चव्हाण यांचा दोन एकर, दत्ता राऊत चव्हाण यांचा दीड एकर, पंडित गबरू राठोड यांचा तीन एकर, श्याम काळू राठोड यांचा एक एकर, भगवान दिगंबर जाधव यांचा एक एकर, प्रकाश भीमराव राठोड यांचा एक एकर आणि गोविंद झटे यांचा ०.२० एकर ऊस जळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या सात शेतकऱ्यांचे नुकसानीचे अनुसार सुमारे९.७० एकराचे नुकसान झाले आहे. उभ्या ऊसाच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाया जाण्याचा धोका आहे.

महसूल आणि कृषी विभागाने घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, तर महावितरणने घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. तसेच शिवारातील धोकादायक वीजतारा व खांबांची तातडीने दुरुस्ती करून नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments