आपला दसरा आपली परंपरा
दैनिक लोक युवा बीड प्रतिनिधी प्रशांत बांगर
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्री संत भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट (भगवान भक्तीगड) येथील यंदाचा भव्य दसरा मेळावा आगामी २० ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. संत भगवान बाबांपासून सुरू झालेली आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जोपासलेली ही ऐतिहासिक परंपरा यंदाही नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली अत्यंत दिमाखात पार पडणार आहे. या महामेळाव्याला राज्यभरातून लाखोंच्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुरू केलेल्या या दसरा मेळाव्याच्या परंपरेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदाही हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हा सोहळा संपन्न होत आहे. या मेळाव्यात राज्याचे नेते, माजी मंत्री धनंजयजी मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, खासदार आणि राज्यातील नामवंत मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. गोपीनाथराव मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे यांना मानणारा अठरापगड समाज, वारकरी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणाऱ्या या महामेळाव्यासाठी मुंडे भक्त आणि समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. वर्षभर कुठेही राहा, पण दसऱ्याला सावरगावला दिसा, अशी आर्त साद घालत या ऐतिहासिक मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याच्या आव्हानं गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात येत आहे

0 Comments