दैनिक लोक युवा जिल्हा प्रतिनिधी, नितीन राठोड
खटाव तालुक्यातील वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गाळ झालेले 16 मोबाईल मूळ मालकांना परत. करण्यात आले आहे. अंदाजे ३ लाख ५७हजार रुपये किमतीचे मोबाईल त्यांना आज परत करण्यात आले असल्याची माहिती वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. याबाबत त्यांनी दिलेली अधिक माहिती अशी सन2026 मध्ये वडूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत फोन शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
त्या मोहिमेदरम्यानCEIR पोर्टल द्वारे व उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्र इतर राज्यामध्ये वापरात असलेल्या हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला. त्यासाठी संबंधित मोबाईल धारकांशी सातत्याने संपर्क साधून व तांत्रिक तपासाच्या आधारे एकूण 16 मोबाईल फोन, अंदाजे ३५७,०००/-रुपये किमतीचे मोबाईल शोधून काढण्यात आले. तसेच त्या मोबाईल फोनची खात्री करून ते आज रोजी मूळ मालकाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. हरवलेल्या मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी वडूज पोलिसांचे आभार व्यक्त केले.
तसेच सदरची मोहीम अशाच प्रकारे सातत्याने राबवण्यात येणार असून नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ वडूज पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईलचाlMEl क्रमांक सुरक्षित ठेवावा असे आवाहन घनश्याम सोनवणे प्रभारी अधिकारी वडूज पोलीस स्टेशन यांनी केले आहे सदरची कारवाई मा. डॉ. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, मा. वैशाली कडूकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. रंजीत सावंत डी. वाय. एस. पी. दहिवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वडूज पोलीस स्टेशनचे घनश्याम सोनवणे निरीक्षक पो.हवा. शिवाजी खाडे ,म.पो.क ॉ. वैशाली कटरे, गणेश शिरकुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments