Ticker

6/recent/ticker-posts

खापरदरीत नवदुर्गेची थाटात स्थापना; ११ वर्षांची भक्तीची परंपरा कायम



 दै.लोकयुवा | मानोरा (जगदीश शा. राठोड)

  मानोरा:- तालुक्यातील ग्राम खापरदरी येथे नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यंदाही नवरात्रोत्सवाची भक्तिमय सुरुवात करण्यात आली असून, देवीची विधिवत स्थापना नुकतीच करण्यात आली. गेल्या ११ वर्षांपासून गावात नवदुर्गा उत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू असून, यंदाही मोठ्या उत्साहात ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त देवीची आकर्षक सजावट करण्यात आली असून, परिसरात विद्युत रोषणाईमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीच्या स्थापनेनंतर दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, पूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.

गेल्या अकरा वर्षांपासून नवदुर्गा उत्सवाच्या माध्यमातून गावात धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्सवाच्या निमित्ताने गावातील नागरिक एकत्र येत असून, नवदुर्गेच्या आराधनेतून भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जात आहे.

 *नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. ग्रामस्थांचेही उत्स्फूर्त सहकार्य लाभत आहे. नवदुर्गेच्या स्थापनेने खापरदरीत नवरात्रोत्सवाला भक्तिमय प्रारंभ झाला असून, ११ वर्षांची परंपरा यंदाही उत्साहात पुढे सुरू आहे.*

Post a Comment

0 Comments