Ticker

6/recent/ticker-posts

वकील बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील : आ. हिकमत उढाण



जालना / संतराम जाधव

घनसावंगी न्यायालयात नवनियुक्त वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घनसावंगी, दि. ३ सप्टेंबर २०२६ : घनसावंगी येथील न्यायालयात वकील संघाच्या नवनियुक्त कार्यकारिणीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचा आमदार हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार उढाण यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार हिकमत दादा उढाण यांनी उपस्थित वकील बांधवांशी संवाद साधत न्यायालयीन कामकाजादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी व समस्यांची माहिती जाणून घेतली. वकील बांधवांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर आमदार उढाण यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

“वकील बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून, येणाऱ्या काळात सर्व प्रश्न मार्गी लावले जातील,” असा विश्वास आमदार हिकमत दादा उढाण यांनी यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमास घनसावंगी न्यायालयातील सर्व वकील बांधव, कर्मचारी तसेच अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments