स्वच्छतेचा नारा देणाऱ्या नगरपरिषदेचे पण डोळे बंद
धारूर / चेतन लोखंडे
धारूर शहरातील स्थानिक परिसरातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना सध्या अस्वच्छतेचे आगार बनला असून, प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे मुक्या जनावरांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. दुरुस्ती आणि स्वच्छतेअभावी या दवाखान्याची दुरवस्था झाली असून संतप्त पशुपालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
लाखो रुपयाची इमारत पण नाव गायब
मुख्य समस्या व दुरवस्था:घाणीचे साम्राज्य: दवाखान्याच्या आत आणि परिसरामध्ये प्लास्टिक व कचऱ्याचे ढीग, लांबच लांब गवत आणि दुर्गंधी पसरली आहे. भटक्या कुत्र्यांचे घर झाले आहे. जनावरांच्या मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावली जात नाही.पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची वानवा: उपचारासाठी येणाऱ्या जनावरांना व डॉक्टरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. साफसफाई नियमित होत नसल्याने डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोजच्या त्रासाला पशुवैद्यकीय दवाखान्यामधील अधिकारी व कर्मचारी पण कंटाळले
पशू पालकांची हेळसांडया भागातील शेतकरी दुग्ध व्यवसाय आणि शेतीवर अवलंबून आहेत. जनावरी आजारी पडल्यास त्यांना या दवाखान्यात आणावे लागते; परंतु येथील अस्वच्छतेमुळे जनावरांच्या आजारात भर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेत दवाखान्याच्या बाजूला चौफेर संरक्षण भिंत बांधून गेट बसवण्यात यावा व आत मध्ये फ्लेवर ब्लॉक व गच्ची, पाण्याची सोय, करून द्यावी अशी मागणी शेतकरी पशुपालकांकडून होत आहे.

0 Comments