Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभा, शाखा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत आंबेगाव तालुक्यातर्फे BSI २५ अंतर्गत भव्य सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व कौटुंबिक सोहळा उत्साहात संपन्न



घोडेगाव:- सलीम इनामदार

      भारतीय बौद्ध महासभा, शाखा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत आंबेगाव तालुक्याच्या वतीने वनमाला मंगल कार्यालय, घोडेगाव येथे आयोजित भव्य सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व कौटुंबिक सोहळा भारतीय बौद्ध महासभा, शाखा आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष आद. महेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाच्या भव्य परेड व मानवंदनेने झाली. मेजर सुजितकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलाच्या जवानांनी प्रभावी मानवंदना सादर केली. त्यानंतर भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अन्य महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर आद. शांताराम गायकवाडयांच्या प्रमुख उपस्थितीत तुषार सोनवणे* यांच्या हस्ते उपस्थितांना सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.जिल्हा उद्योग केंद्र, पुणे येथील उद्योग अधिकारी आद. पल्लवी वाडेकर* यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध उद्योग व स्वयंरोजगार योजनांची सविस्तर माहिती देत युवक-युवतींनी रोजगार शोधणारे न बनता रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनावे, असे मार्गदर्शन केले.त्यानंतर आद. दलितानंद थोरात* यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वर्षावास उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आद. रवींद्र अभंग* गुरुजी यांनी धम्म प्रवचनातून वर्षावासाचे महत्त्व, पंचशीलाचे पालन आणि बौद्ध धम्मातील नैतिक मूल्ये यांचे विवेचन केले. आद. पी. के. पवार* यांनी समाज संघटन, संस्कार, शिक्षण आणि युवकांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले.भोजनानंतर आयोजित ५० गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात समाज जोडो अभियान अंतर्गत सर्व जातीचे शिष्यवृत्ती, इयत्ता १० वी, १२ वी, एलएलबी, डिप्लोमा, एम.एस्सी., एमबीबीएस तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र, प्रेरणादायी पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.* उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

याच कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा, शाखा आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष आद. महेश वाघमारे यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था, मंडळे, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक कार्याचा गौरव केला.

तसेच समता सैनिक दलामध्ये डिव्हिजन ऑफिसर पदावर बढती मिळाल्याबद्दल आद. गौतम खळे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, शाखा आंबेगाव तालुका (पुरुष व महिला विभाग), समता सैनिक दल, भीम जयंती महोत्सव संस्था (रजि.) आंबेगाव तालुका तसेच पंचशील उत्कर्ष मंडळ, पुणे व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.*

विशेष उपस्थिती

दलितानंद थोरात (जिल्हा सरचिटणीस), पी. के. पवार (संस्कार उपाध्यक्ष), रवींद्र अभंग (जिल्हा कोषाध्यक्ष), मेजर सुजितकुमार जाधव (संरक्षण उपाध्यक्ष), अशोक टपाले (प्रचार व पर्यटन सचिव, पुणे जिल्हा), गौतम थोरात (जिल्हा संघटक), विकास मोरे (अध्यक्ष, भीम जयंती महोत्सव संस्था), गणेश लव्हांडे (सामाजिक कार्यकर्ते), मीनाक्षी वाघमारे (तालुकाध्यक्ष, महिला विभाग), सीता वाघमारे (माजी ग्रामपंचायत सदस्य, घोडेगाव), विकास साळवे (हॉटेल कमलजादेवी सर्वेसर्वा तथा माजी सरपंच, कळंब), रमेश घोडेकर (सिव्हिल इंजिनिअर), राकेश डोळस (प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष, जुन्नर तालुका), नवीन सोनवणे (पत्रकार), शांताराम गायकवाड (सरचिटणीस, खेड तालुका), तान्हाजी आस्वारे (संरक्षण उपाध्यक्ष), किशोर वाघमारे (पत्रकार), विनोद रोकडे किरण खरात, दीपक रोकडे,सह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सदस्य, विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा, शाखा आंबेगाव तालुक्याचे सरचिटणीस आद. सचिन ढोणे* यांनी केले. शब्दसम्राट भाषणकला अकॅडमीचे आद. अक्षय साळवे* यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर अतिश ढोणे* यांनी सूत्रसंचालनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी गणेश वाघमारे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.


Post a Comment

0 Comments