पालघर | ६ ऑगस्ट २०२६ प्रतिनिधी फैजान खान
: समाजाप्रती संवेदनशीलता आणि मानवतेचा अनोखा संदेश देणारी घटना जव्हार प्रकल्पातील अतिदुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळा, दाभेरी येथे घडली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊसाठी मिळणारे पैसे जतन करून आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी तब्बल १७ हजार ६० रुपये जमा केले.
विद्यार्थ्यांनी जमा केलेली ही मदतीची रक्कम जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.डॉ. बासुर यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सहानुभूती आणि आपत्तीग्रस्तांविषयीची संवेदनशीलता अधिक दृढ झाली. स्वतःच्या खाऊच्या पैशांचा त्याग करून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी मानवतेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडून उचलण्यात आलेले हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, संकटाच्या काळात सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे.

0 Comments