आरिफ खान पठाण प्रतिनिधी,
दै लोक युवा न्यूज मेळघाट, धारणी
धारणी तालुक्यातील चेंडो गावात उभारण्यात आलेला जिओचा मोबाईल टॉवर सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. टॉवर उभा असूनही परिसरातील नागरिकांना अपेक्षित मोबाईल नेटवर्क सुविधा मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मोबाईल नेटवर्कअभावी फोन कॉल, इंटरनेट तसेच ऑनलाइन कामकाजावर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
टॉवर उभारण्यात आला असताना त्याचा प्रत्यक्ष उपयोग नागरिकांना कधी मिळणार? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित जिओ प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन टॉवरची सेवा सुरू करून चेंडो गावातील नागरिकांना सुरळीत नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

0 Comments