Ticker

6/recent/ticker-posts

SIR कामासाठी शिक्षकांना २० दिवस कार्यमुक्त करा

 



प्रत्येक शिक्षकास इतर विभागातून एक सहाय्यक द्या – जामनेर येथे तहसीलदारांना शिक्षकांचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी जामनेर महेशप्रसाद दिक्षित: 

 विशेष गहन पुनरिक्षण (SIR)  म्हणजेच मतदार यादीचे पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने त्यांना किमान २० दिवसांसाठी शाळेतील अध्यापन कार्यातून कार्यमुक्त करण्यात यावे, तसेच प्रत्येक शिक्षकास इतर शासकीय विभागातून एक सहाय्यक उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी जामनेर तालुक्यातील प्रादेशिक शिक्षक संघटना जळगाव जिल्हा , माध्यमिक शिक्षक संघटना जामनेर तालुका व इतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, SIR चे काम अत्यंत वेळखाऊ व जबाबदारीचे असून त्याचवेळी शाळेतील नियमित अध्यापन, प्रशासकीय कामे आणि इतर शैक्षणिक उपक्रमही सांभाळावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षकांना SIR चे काम प्रभावीपणे पूर्ण करता यावे यासाठी त्यांना २० दिवसांसाठी शाळेतून कार्यमुक्त करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच, SIR मोहिमेदरम्यान आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, माहिती संकलन आणि इतर प्रशासकीय कामांसाठी प्रत्येक शिक्षकास इतर शासकीय विभागातून एक सहाय्यक उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामुळे काम अधिक वेगाने, अचूकपणे आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असे शिक्षकांनी निवेदनात नमूद केले.

यावेळी तहसीलदारांनी शिक्षकांचे निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिक्षक प्रतिनिधींनी दिली.

Post a Comment

0 Comments