*जालना / संतराम जाधव:*
जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आज नागरिकांना मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत महत्त्वाचे आवाहन केले आहे.
30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत प्रत्येक मतदाराला 'गणना फॉर्म' (Enumeration Form) देण्यात येणार आहे. हा फॉर्म भरून BLO कडे परत करणे बंधनकारक असून, अन्यथा मतदार यादीतून नाव कमी होण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
नागरिकांनी 2002 च्या मतदार यादीत स्वतःचे नाव असल्यास 'सेल्फ मॅपिंग' व आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव असल्यास 'प्रोजेनी मॅपिंग' करावी. BLO कडून फॉर्म घेऊन मॅपिंग तपासून 29 जुलैपूर्वी परत करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

0 Comments