Ticker

6/recent/ticker-posts

धडगाव तालुक्यातील तलाई शासकीय आश्रम शाळेतील विविध समस्यांबाबत शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार संघटनेचे निवेदन



नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन

शाह :-  धडगाव तालुक्यातील तलाई येथील शासकीय आश्रम शाळेला शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार संघटना, नंदुरबार जिल्ह्याच्या अध्यक्षा वैशाली मीनल वसावे, धडगाव तालुकाध्यक्ष खेमजी दादा वसावे तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन तेथील विविध समस्यांची पाहणी केली.

     यावेळी शासकीय मुलींचे वस्तीगृहाची इमारत उपलब्ध असूनही महिला कर्मचारी नसल्यामुळे वस्तीगृह सुरू करता आलेले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. त्यामुळे विद्यार्थिनींना दररोज सुमारे ९ ते १० किलोमीटर पायी प्रवास करून शाळेत यावे लागत असल्याचे समोर आले.

      तसेच इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक शिक्षकांची कमतरता असल्याचेही आढळून आले. या सर्व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीने तळोदा येथील प्रकल्प कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

      यावर प्रकल्प अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या पाच ते सहा दिवसांत महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच शिक्षकांची कमतरता आणि इतर प्रलंबित समस्यांबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.


Post a Comment

0 Comments