Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माहूरमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात


श्रीक्षेत्र माहूर  (प्रतिनिधी)

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, तालुका माहूरच्या वतीने बुधवार, दि. २२ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय, माहूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित या शिबिराला कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील सर्व मंडळांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून माहूर येथे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा प्रदेश महामंत्री सुनीलजी राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपा नांदेड उत्तर प्रभारी किरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर तसेच किनवट-माहूर विधानसभा बीएलए-१ बाबूदादा केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असल्याचे सांगत युवकांनी नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, अजय पवार, अपील बेलखोडे, मनीष राठोड, रामकृष्ण केंद्रे, पवन चव्हाण, हर्षदीप दीक्षित, रामकृष्ण जायभाय यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या रक्तदान शिबिरास किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, रक्तदाते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.


Post a Comment

0 Comments