Ticker

6/recent/ticker-posts

घनसावंगीत शेतकरी नेत्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी



मंगेश साबळे पाटील व रमेश पाटील यांच्या समर्थनार्थ तहसीलदारांना निवेदन

जालना /संतराम जाधव 

घनसावंगी, दि. 13* : शेतकरी पुत्र श्री. मंगेश साबळे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे अन्यायकारक असून त्यांची निष्पक्ष चौकशी करून गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

आज घनसावंगी तहसील कार्यालयात तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी रमेश भाग्यरथाबाई विठ्ठलराव पागोटे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

*निवेदनातील ठळक मुद्दे*  

1. *निष्पक्ष चौकशीची मागणी* : दाखल गुन्हे अन्यायकारक आहेत. त्यांची सखोल चौकशी करून सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

2. *घटनात्मक अधिकार* : लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मत मांडण्याचा, समाजातील समस्या प्रशासनासमोर मांडण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.

3. *आंदोलनाचा इशारा* : दोन दिवसांत लेखी कार्यवाही न झाल्यास तालुक्यातील सर्व नवयुवक आणि शेतकरी पुत्र तारीख आणि वेळ ठरवून तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही नमूद करण्यात आले.

उपस्थिती

या वेळी शेतकरी प्रतिनिधींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments