Ticker

6/recent/ticker-posts

गावठी कट्टा सदृश लायटर व धारदार तलवार जप्त;



( एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन ची कारवाई)

{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}

नांदेड जिल्हा मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन ,पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत एका इसमाकडून गावठी कट्टा सदृश लायटर व धारदार तलवार जप्त केली आहे.

दि.15 जुलै 2026 रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीमध्ये गस्त घालत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,हनमंत ऊर्फ अविनाश किशन गजले (वय 23 वर्ष),रा.निळा ता.लोहा जि.नांदेड,ह.मु.वैभव बार जवळ, गुंडेगाव हा आपल्या सोशल मीडिया (इन्स्टाग्राम) अकाऊंटवर हातात शस्त्र घेऊन फोटो टाकून परिसरात दहशत निर्माण करत आहे. माहितीची खात्री करून पंचांसमक्ष संशयिताची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान त्याच्याकडून गावठी कट्टा सदृश लायटर तसेच त्याने लपवून ठेवलेली सुमारे 35 इंच लांबीची धारदार तलवार हस्तगत करण्यात आली.जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹1,500/- असून पंचनामा करून तो जप्त करण्यात आला.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 870/2026 कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई मा.श्री.डॉ.नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक,नांदेड,सुरज गुरज,अपर पोलीस अधीक्षक,नांदेड,श्री.ओमकांत चिंचोलकर,पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.व्यंकट कुसमे,पोलीस उप निरीक्षक,पोलीस अंमलदार विष्णु कल्याणकर,शेख गफार, टिपरसे,पवार,तेलंग,माने,पालीमकर सर्व नेमणुक पो.ठाणे नांदेड ग्रामिण यांनी पार पाडली आहे.

नांदेड जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की,अवैध शस्त्र बाळगणे,त्यांचे प्रदर्शन करणे किंवा सोशल मीडियावर शस्त्रांचे फोटो/व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.अशा प्रकारची माहिती नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा नांदेड पोलिसांना कळवावी..!

Post a Comment

0 Comments