Ticker

6/recent/ticker-posts

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत 'शेतकरी अपघात विमा योजना' सुरू होणार मा .गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांची माहिती



मंचर, प्रतिनिधी सलीम इनामदार

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमितपणे शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षण देण्यासाठी 'शेतकरी अपघात विमा योजना' लवकरच सुरू होणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवार दि.२७ रोजी दिली. या योजनेस महाराष्ट्र शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली असून, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने त्याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले असून बाजार समितीला ते पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याची कार्यवाही केली जाईल. असे त्यांनी सांगितले.

मंचर बाजार समितीच्या सभागृहात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णूकाका हिंगे पाटील, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, संचालक सोमनाथ काळे, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले उपस्थित होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीने सादर केलेल्या प्रस्तावाची शासनाने सकारात्मक दखल घेतली असून, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील तरतुदीनुसार या योजनेस पूर्वमान्यता देण्यात आली आहे. आवश्यक अटी व शर्तीची पूर्तता झाल्यानंतर अंतिम मंजुरीचे सविस्तर आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. वळसे पाटील यांनी सांगितले की, बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments