Ticker

6/recent/ticker-posts

बिलोलीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन



बिलोली प्रतीनीधी विनोद वाघमारे 

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, सर्वसामान्यांचे लाडके व तडफदार नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बिलोली शहरात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरिक, समाजसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितदादांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दादांच्या विकासात्मक राजकारणाला, त्यांच्या परखड विचारांना आणि जनसामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांना आदरांजली अर्पण केली. या वेळी राष्ट्रवादीचे अभिजित तुडमे, इंद्रजित तुडमे , समाज सेवक सय्यद रियाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद मांजरमकर , युवा तालुकाअध्यक्ष निळकंठ दुधले ,प्रदिप अंकुश, संतोष अंकुशकर संजयकुमार पोवाडे, मारोती भुसावळे , नागनाथ वाडिकर ,राजु बोईनवाड, सह अनेक जन उपस्थित होते

Post a Comment

0 Comments