जिला प्रतिनिधी गणपति रॉय
वसई-विरार, मुंबई: 'अमली पदार्थ विरोधी आंतरराष्ट्रीय दिना'चे औचित्य साधून, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून ३२६.५५९ किलो अमली पदार्थ आणि १,५४१.३५६ किलो कच्चा माल नष्ट केला. एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत ६७ प्रकरणांमध्ये हा साठा जप्त करण्यात आला होता. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा येथील एका प्लांटमध्ये ही कारवाई करण्यात आली. यामध्ये गांजा, चरस, एमडी (MD), हेरॉईन, एफेड्रिन, कोकेन, खोकल्यावरील औषध (कफ सिरप) आणि ट्रॅमाडोल यांसारख्या विविध अमली पदार्थांचा समावेश होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंग्ट्रे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. अमली पदार्थांच्या व्यापाराविरुद्धची ही मोहीम यापुढेही अविरतपणे सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

0 Comments