प्रतिनिधी . सागर काळे.
भोळसर (वेडपट) महिलेला बसची जोरदार धडक; गंभीर जखमी, सुजाण नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले! अंबाजोगाई बस स्थानक परिसरात पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानक परिसरात फिरणाऱ्या एका भोळसर (वेडपट) महिलेला भरधाव बसची धडक बसल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनास्थळी उपस्थित सुजाण नागरिकांनी तत्परता दाखवत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडवले.
मात्र, अंबाजोगाई बस स्थानकात असे अपघात वारंवार का घडत आहेत? यापूर्वीही अनेक निष्पाप नागरिकांनी अशाच अपघातांमध्ये आपले हात-पाय कायमचे गमावले आहेत, तर काहींना जीवही गमवावा लागला आहे. तरीही बस स्थानकातील वाहतूक व्यवस्थापन आणि चालकांच्या निष्काळजीपणावर ठोस कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रशासन आणि एस.टी. #महामंडळ आता तरी जागे होणार का? की आणखी एका निष्पाप जीवाची वाट पाहणार?

0 Comments