Ticker

6/recent/ticker-posts

अध्यक्षपदी सुनील कांबळे, उपाध्यक्षपदी अक्षय वैरागे, तर सचिव पदी रोहित लोखंडे, सहसचिव शक्ती कांबळे व्यवस्थापक पदी अजय वैरागे यांची निवड



धारूर प्रतिनिधी/ चेतन लोखंडे

एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमांनी साजरी होणार धारूर साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी धारूर येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करण्याचा निर्णय जयंती उत्सव समितीच्या 5 बैठकीत घेण्यात आला. साठेनगर येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडलेल्या बैठकीत जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सुनील कांबळे यांची अध्यक्षपदी, अक्षय वैरागे यांची उपाध्यक्षपदी, रोहित लोखंडे यांची सचिवपदी, शक्ती कांबळे यांची सहसचिवपदी तर अजय वैरागे यांची व्यवस्थापकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीत जयंती उत्सवाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार असून, दुपारी ४ वाजता भव्य-दिव्य मिरवणुकीसह विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

यावेळी नगरसेवक सुजित वैरागे, प्रदीप सहाने, बंडू वैरागे, रामकिसन लोखंडे प्रा. राम लोखंडे, नागेश वैरागे, दत्ता शिंदे, शैलेश वैरागे, रमेश पारवे, संदीप वैरागे, कृष्णा लोखंडे, सागर वैरागे, सचिन लोखंडे, दादाराव खंडागळे, आकाश वैरागे, अमित कांबळे, मुन्ना लोखंडे, आदित्य शिरसाठ, चेतन लोखंडे, गणेश लोखंडे, सुरज लोखंडे,रितेश पारवे, निखिल शिंदे यांच्यासह समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments