काटोल प्रतिनिधी :- जनसामान्यांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व तळागाळातील लोकांसाठी सातत्याने कार्य करणारे युवा सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. विकासजी सोमकुवर यांची दैनिक लोक युवा न्यूजच्या तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या जिद्द, मेहनत आणि समाजसेवेच्या बळावर त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, अडचणी, अधिकार आणि विविध समस्या जाणून घेऊन त्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.
पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज अधिक प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचविणे, समाजहिताच्या बातम्यांना प्राधान्य देणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या निर्भयपणे मांडणे, हा त्यांचा संकल्प आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी व जनहिताच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments