Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ओझर येथे अभिवादनाचा भव्य कार्यक्रम



निफाड प्रतिनिधी जुबेर शेख

ओझर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त शनिवार, ३१ मे २०२६ रोजी ओझर येथे भव्य अभिवादन व जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला ओझर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अनिताताई घेगडमल, उपनगराध्यक्षा जानवीताई कदम यांच्यासह नगरसेविका सौ. पल्लवी देशमुख, योगिताताई कदम, रूपालीताई शेळके, ज्योतीताई कुंदे तसेच नगरसेवक सुनील भाऊ कदम, अशोक कदम, रोहित लबडे, वृशाल पगार उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार अनिल अण्णा कदम, प्रदीप अहिरे, दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे संचालक मंडळ, अशोक शेलार, बापू शिंदे, घोटेकर काका, संजय वेताळ, १२ बलुतेदार महासंघाचे दिलीप मंडलिक, संतोष सोनवणे, रवींद्र आहेर, राजेंद्र सोनवणे, राहुल खाडे, रामराव बोरस्ते उपस्थित होते.

तसेच ओझर नगर परिषदेचे अधिकारी कुटे साहेब, ओझर मर्चंट बँकेचे मा. चेअरमन रवीशेठ भट्टड, संचालक विजूशेठ पवार, पुंडलिक रासकर, श्रीकांत कदम, मारुती बँकेचे चेअरमन संजू भाऊ पगार, ओझर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शालिक आप्पा कदम, ॲड. श्रीराम भडांगे, महाले सर, राजू लोकणार यांच्यासह पंचक्रोशीतील धनगर समाज, ओझर ग्रामस्थ व अहिल्याप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा अनिताताई घेगडमल, अनिल अण्णा कदम, प्रदीप अहिरे, श्रीकांत कदम, भारत पल्हाळ, माणिकराव सरोदे, ढेपले सर, पोलीस दादा नाईकवाडे, स्वरा, सृष्टी, धनश्री आणि सर्वज्ञ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला राजाराम दहाडदे, शांताराम पल्हाळ, ज्ञानेश्वर पल्हाळ, भारत पल्हाळ, चंद्रकांत मोगरे आणि विलास फटांगळे यांनी मार्गदर्शन केले.

अहिल्यादेवी स्मारकासाठी यतीन भाऊ कदम, दुर्गामाता मंदिर ट्रस्ट व समाजबांधव यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अशोक पल्हाळ यांनी मानले तर सूत्रसंचालन मुरडनर सर यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन अशोक पल्हाळ, गोपीनाथ पल्हाळ, गौरव पल्हाळ, मनोज दहाडदे, आदेश शिंदे, संतोष पल्हाळ व आकाश पल्हाळ यांनी केले. राजमाता अहिल्यादेवींच्या विचारांना उजाळा देत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Post a Comment

0 Comments