Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मल्हार नगर, वावोशी येथे उत्साहात साजरी



वावोशी संदीप जाधवः 

मल्हार नगर, वावोशी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला जयंती महोत्सव रविवारी 31 मे 2026 रोजी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. जय मल्हार मित्र मंडळ व अहिल्या महिला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, भाविक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण महापूजेने झाली. त्यानंतर नामसप्ताह, महाप्रसाद, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या लोककल्याणकारी विचारांना उजाळा दिला..

सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन कार्यक्रमाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर रंगलेल्या आमने-सामने डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. बुवा संदीप लोके, आणि बुवा विनोद चव्हाण यांच्या पथकांनी उत्कृष्ट भजने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले

या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजहितकारी कार्याचे स्मरण करून त्यांच्या आदर्शावर चालण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे मल्हार नगर परिसरात उत्सवाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.


Post a Comment

0 Comments