श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे)
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीक्षेत्र माहूर येथील कपिलेश्वर मंदिर प्रांगणात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. योगगुरू डॉ. राम कदम व रेणुकादास बेहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात महिला व पुरुष अशा मोठ्या संख्येने योगसाधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाभ्यास केला.
योगामुळे निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनशैली प्राप्त होते, असा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानाचे प्रात्यक्षिक करून नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजक पद्मा गिऱ्हे तर सहसंयोजक म्हणून गौरव जयस्वाल व स्वाती आडे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शोभाताई महामुने, घाटे मॅडम, प्रणिता जोशी, वंदना राठोड, शीतल केदार, पुरीताई, ऋतुजा गिऱ्हे, अनुजा गिऱ्हे, कैलास राठोड, राजेंद्र केशवे सर, कांतराव घोडेकर, रमण जायभाये , अनिल वाघमारे, योगेश परसवाळे, फिरोजभाई, कैलास फड, नंदकुमार जोशी, रामकृष्ण केंद्रे, छोटू दीक्षित, बाळू शिंदे, संजय बनसोडे, रामराव राठोड, राठोड सर,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी संयोजकांचे कौतुक केले. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, आनंदी आणि तणावरहित जीवनाचा आधार असल्याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

0 Comments