{नांदेड प्रतिनिधी-शेख अनिस}
नांदेड-लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारावर होणारे हल्ले.आणि दबावाचे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. असा स्पष्ट आणि इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.पत्रकारांना धमकावणे व त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणे किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले पत्रकारांना निर्भयपणे.निष्पक्षपणे आणि स्वतंत्रपणे काम करता यावे.यासाठी राज्य सरकार कटिबंद्ध असल्याचेही असल्याचेही त्यांनी सांगितले मुख्यमंत्र्याच्या या ठाम भूमिकेमुळे.राज्यातील पत्रकारांमध्ये.समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून.पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने घेतलेली ही भूमिका महत्वपूर्ण.मानली जात आहे.पत्रकारावरील अन्याय,धमक्या आणि.हल्ल्याविरोधात कठोर कारवाईचा.स्पष्ट संदेश या इशाऱ्यातून देण्यात आला आहे.पत्रकारावर दबाव नव्हे,तर कायद्याचा धाक असला पाहिजे,असा स्पष्ट संदेश देतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी. पत्रकाराच्या संरक्षणासाठी सरकार सवेदनंशील आणि सज्ज असल्याचे अधोरेखित केले.राज्यातील माध्यम प्रतिनिधींना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व उपायोजना करण्यात येतील,असेही त्यांनी यावेळी नमूद केल..!

0 Comments