धारूर:प्रतिनिधी (दै.लोकयुवा)
किल्ले धारूर शहरात पाणीप्रश्न गंभीर झाला असून, साठे नगर मधील गोरगरीब जनतेने दहा हजार वीस हजार नळपट्टी भरून सुद्धा नळ कोरडेच पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. 'नगरपालिका प्रशासन पाणीपुरवठा कधी सुरळीत करणार?' असा संतप्त सवाल आता शहरातील त्रस्त नागरिक विचारत आहेत. एकीकडे नळाला पाणी नाही आणि दुसरीकडे प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात नसल्याने
जनतेमध्ये मोठी नाराजी पसरली आहे आश्वासनांचा पाऊस, पण नळ कोरडेचः नगरपालिकेकडून वेळोवेळी दुरुस्तीची किंवा तांत्रिक कामाची कारणे दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात नळाला पाणी येण्याचे दिवस लांबत चालले आहेत. केवळ आश्वासने देऊन जनतेची तहान भागत नाही, हे आता प्रशासनाने लक्षात घेण्याची वेळ आली आहे.
महिलांची पायपीट आणि आर्थिक फटकाः पाणी नसल्यामुळे गृहिणींचे हाल होत असून, पहाटेपासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ज्यांची परिस्थिती आहे त्यांना खाजगी टँकरसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत, तर गरीब जनतेचे काय? असा प्रश्न चेतन लोखंडे यांनी मांडला आहे

0 Comments