Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या धख्ख्याने चोरांबा येथे शेतकऱ्याचा मृत्यू: परिसरात हळहळ



शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला वीज खांबाच्या ताराला शॉक बसला

धारूर प्रतिनिधी:चेतन लोखंडे 

धारूर तालुक्यातील चोरंबा येथे शेतात उस पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या खांबाच्या ताराला (स्टे थायर) शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वीज सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेली माहिती

गंगाराम श्रीराम गांधले (वय 45, रा. चोरूंबा) हे शुक्रवारी मध्यरात्री शेतातील उस पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री 12 ते सकाळी 6 या वीजपुरवठ्याच्या वेळेत काम करत असताना शेतातील वीज खांबाच्या ताराच्या संपर्कात आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्व. गंगाराम श्रीराम गांधले (वय 45, रा. चोरंबा)

घटनेची माहिती

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे गांधले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळळा असून परिसरात शोककळा पसरली आहे.

शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

दरम्यान, तालुक्यात अलिकडच्या काळात विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वीज सुरक्षेबाबत मागणी

वीज वितरण कंपनीने शेतातील वीज खांब, तारा व तानांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments