Ticker

6/recent/ticker-posts

ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत आरोपीकडून प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला, सुगंधीत जर्दा आसा एकूण 11.15.640/-रुपयाचा मुद्देमाल जप्त



(स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड यांची कार्यवाही)

{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}

नांदेड मा.श्री.अभिनाश कुमार,पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत अवैध धंदयावर कायदेशीर कार्यवाही करणे बाबत श्री.अतुल भोसले,पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नांदेड यांना आदेशीत केले होते.त्याअनुषंगाने श्री.अतुल भोसले,पोलीस निरीक्षक स्था.गु.शा नांदेड यांनी स्था.गु.शा.येथील पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांचे पथकातील अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते.

त्यावरून दिनांक 17.06.2026 रोजी पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांचे पथकातील अंमलदार तसेच श्रीमती अमृता दुधाटे, अन्न सुरक्षा अधिकारी,अन्न व औषध प्रशासन,नांदेड असे पो.स्टे.हिमायतनगर हद्दीमध्ये अवैध गुटखा अनुषंगाने माहिती घेत पेट्रोलींग करीत असताना दोन इसम हजरत चौक, बेस्ट कॉलनी,हिमायतनगर येथे स्विफ्ट डिझायर कारमध्ये अवैध गुटखा भरून विक्रीसाठी थांबलेले असल्याची गोपनीय माहिती मिळाली.त्यावरून सदरची माहिती वरिष्ठांना कळवुन त्यांचे आदेशाप्रमाणे मिळालेल्या माहितीचे ठिकाणी हजरत चौक,वेस्ट कॉलनी,हिमायतनगर येथे सापळा लावुन स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 48F0708 मधील इसम नामे 01) शेरखॉन मुसाखान पठाण वय 32 वर्ष, रा.संभाजीनगर,तामसा ता. हदगाव ह.मु.वेस्ट कॉलनी हिमायतनगर.02) शाहरूखखान मुसाखान पठाण वय 28 वर्ष,रा. संभाजीनगर,तामसा ता. हदगाव यांना ताब्यात घेवुन कारची तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ गुटखा,सुगंधीत पान मसाला,सुगंधीत जर्दा, तंबाखु मिळुन आला.त्यांना सदरचा प्रतिबंधीत गुटखा, सुगंधीत पान मसाला, सुगंधीत जर्दा,तंबाखु बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुटखा, पानमसाला हा साई भैया रा. मुधोळ याचेकडून खरेदी करून आनल्याचे तसेच याव्यतीरीक्त गुटखा, पानमसाला हा हिमायतनगर येथील किरायाने राहत असलेल्या घरामध्ये लपवुन ठेवल्याचे सांगीतले. त्यावरून त्यांचे घराची पाहणी केली असात घरामध्ये नायलोनच्या पोत्यात गुटखा,सुगंधीत पान मसाला,सुगंधीत जर्दा, तंबाखु एकुण 4,15,640/-रूपयाचा मिळुन आल्याने स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 48 F 0708 सह एकुण 11,15,640/-रू चा मुद्देमाल जप्त करून नमुद दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन मुद्देमालासह पो.स्टे. हिमायतनगर यांचे ताब्यात देवुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मा.पोलीस अधीक्षक साहेब,नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments